मुंबईः मुंबईमधील सिद्धार्थ कॉलेजच्या पाठोपाठ दादरमधील आंबेडकर भवनही वादाच्या भोवऱ्यात आलं आहे. या भवनाची मालकी असलेला आंबेडकर ट्रस्ट आणि आंबेडकरांचे कुटुंबिय यांच्यामध्ये या जागेच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरुन वाद आहेत.


 

या इमारतीच्या पुनर्विकासासाठी आंबेडकर भवनाचे काल रात्री पाडकाम करण्यात आले, त्याला आंबेडकरांच्या कुटुंबियांनी जोरदार विरोध करत पाडकामाचा निषेध केला.

 

ट्रस्ट विरुद्ध आंबेडकर कुटुंब वाद?

आंबेडकर भवनची इमारत रात्री पाडण्यात आली. या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी जुनी इमारत पाडल्याचा दावा आंबेडकर भवन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला आहे. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांनी आंबेडकर भवनच्या पाडकामाला जोरदार विरोध केलाय. आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी दादरमध्ये परिसराला भेट देऊन घटनेचा निषेध केला आहे.

 

त्यामुळे ट्रस्ट विरुद्ध आंबेडकर परिवार असा वाद पुन्हा रंगण्याची चिन्हं आहेत. सध्या राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड या ट्रस्टचे अध्यक्ष  आहेत.