Mumbai Heavy rains Red alert : मुंबईसह उपनगरांमध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाण्याची साखळी दिसून येत आहे. काही ठिकाणी पाणी नागरिकांच्या कमरेइतकं भरल्याने चालताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे मुंबई, ठाणे, भिवंडी, मिरा-भाईंदर, पालघर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि रायगड या भागांमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Continues below advertisement

मुंबईची लाईफलाईन ठप्प

दरम्यान, पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा देखील टप्प झाली आहे. विशेषतः सायन आणि दादर दरम्यान लोकल वाहतूक अर्ध्या तासाहून अधिक वेळ ठप्प राहण्याचे दृश्य बनले आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे या भागात लोकल सेवेत खोळंबा दिसून येतो आहे.

Continues below advertisement

मध्य रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रचंड पाऊस आणि भरती सुरू असल्यामुळे महानगरपालिकेने फ्लड गेट्स उघडले होते, ज्यामुळे समुद्राचे पाणी मुंबईत शिरण्यापासून रोखले जात आहे. सध्या हे फ्लड गेट बंद करण्यात आले आहेत. कुर्ला, सायन, चुनाभट्टी, टिळक नगर यासह मिठी नदीच्या जवळ असलेल्या परिसरांमध्ये पाणी साचले आहे. दादरसारख्या स्टेशनमध्येही पाणी भरल्याने लोकल सेवेला प्रत्यक्ष फटका बसला आहे. 

मध्य रेल्वेमार्गावर लोकल ट्रेन रुळावर एकापाठोपाठ उभ्या

सध्या सायन आणि दादर दरम्यान अनेक लोकल उभ्या आहेत, पण पाण्याची पातळी ओसरल्यावरच वाहतूक पुन्हा सुरू होईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, रेल्वे ट्रॅकवर पाणी सुरू असल्यामुळे मध्य रेल्वेच्या काही ठिकाणी वाहतूक खोळंबलेली आहे आणि प्रवाशांना अद्याप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबईत आज सरकारी-खासगी कार्यालयांना सुट्टी

भारतीय हवामान खात्याने आज, मंगळवार (19 ऑगस्ट 2025) रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी (मुंबई शहर व उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. शहरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून, ठिकठिकाणी पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) तर्फे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच महापालिका कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. खासगी कार्यालये व आस्थापनांनाही आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षिततेसाठी घरात राहावे, असे आवाहन बीएमसीकडून करण्यात आले आहे.

Local Train Waterlogging LIVE | Mumbai Alret | ट्रॅकवर पाणी, रेल्वे खोळंबली, मुंबईत पावसाचा कहर!

 

हे ही वाचा - 

Mumbai Heavy rains Red alert : मुसळधार पावसाने मुंबईतील डोंगराळ भागातील नागरिकांना हायअलर्ट; विक्रोळी, भांडूपमध्ये नागरिकांना सामानांची बांधाबांध करण्याच्या सूचना