मुंबई : मुंबईतल्या कामा हॉस्पिटलमध्ये एका गुटगुटीत बाळाने जन्म घेतला. या बाळाचं वजन पाच किलोपेक्षाही जास्त आहे. मुंबईतील कुलाब्यात राहणाऱ्या 24 वर्षीय महिलेने या बाळाला जन्म दिला.


प्रसुतीनंतर या बाळाच्या वजनाची 5.38 किलो इतकी नोंद करण्यात आली. प्रसुतीवेळी या महिलेचा रक्तदाब वाढल्याने सिझेरीयन करुन प्रसुती करण्यात आली. बाळ आणि बाळंतीण दोघांचीही प्रकृती ठीक आहे.

सामान्यत: नवजात बाळाचं वजन हे अडीच ते साडेतीन किलोच्या दरम्यान असतं. मधुमेह असलेल्या गर्भवतींमध्ये जास्त वजनाचं बाळ जन्माला येण्याची शक्यता असते. मात्र या प्रकरणात आईला मधुमेह नसतानाही बाळाचं वजन अधिक आहे.