Anant Chaturdashi 2022 : आज दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पा (Ganpati Bappa) भक्तांचा निरोप घेईल.  मुंबईमध्ये बहुतेक सर्व बड्या गणेश मंडळाच्या गणपतींचं आज विसर्जन (Ganesh Visarjan) होईल. लालबाग, परळमधील मोठी गणेश मंडळ असणाऱ्या भागात आज वेगळंच वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये आज विसर्जन मिरवणुकांची धूम पाहायला मिळणार आहे. दोन वर्षानंतर कोरोनाचं विघ्न दूर झाल्यानंतर यंदा गणेशोत्सवाचा उत्साह अधिक आहे. गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकाही सज्ज आहे. विसर्जनासाठी BMCकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. गणेश विसर्जनाची ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 


विसर्जनासाठी BMCकडून अशी केली आहे तयारी 


१. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांच्या स्तरावर 188 नियंत्रण कक्ष.


२. प्रमुख विसर्जन स्थळी 786 जीव रक्षक तैनात. 


३. नैसर्गिक विसर्जन स्थळी आवश्यक तेथे 45 मोटार बोट आणि 39  जर्मन तराफा व्यवस्था.


४. सुसमन्वय साधण्यासाठी प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्ष. 


५. अधिक चांगल्या प्रकाश व्यवस्थेसाठी 3 हजार 069 फ्लड लाईट आणि 71 सर्च लाईट व्यवस्था.


६. महत्त्वाच्या विसर्जन स्थळी वैद्यकीय सामुग्रीसह सुसज्ज असणारे 188 प्रथमोपचार केंद्र आणि 83 रुग्णवाहिका. 


७. निर्माल्यापासून खत बनविण्यासाठी निर्माल्य गोळा करण्यास उपयोगी ठरणारे 357 निर्माल्य कलश आणि 287 निर्माल्य वाहने. 


८. अधिक चांगल्या सुरक्षा व्यवस्थेसाठी 48 निरीक्षण मनोरे आणि आवश्यक तेथे संरक्षक कठडे. 


९. महत्त्वाच्या विसर्जन स्थळी 134 तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था.


१०. श्रीगणेश मूर्ती विसर्जन ऑनलाईन नोंदणी सुविधा ही https://shreeganeshvirsarjan.com  या संकेतस्थळावर उपलब्ध.


११. चौपाट्यांवर श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी येणा-या वाहनांची चाके वाळूमध्ये रुतू नयेत, यासाठी 460 पौलादी प्लेटची व्यवस्था.  


१२. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये कृत्रिम विसर्जन स्थळांची व्यवस्था. 


१३. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सुमारे 10 हजार अधिकारी आणि कर्मचारी यांना गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कार्यतत्पर राहण्याचे निर्देश.


इतर महत्वाच्या बातम्या


Ganesh Visarjan 2022 Live Updates : मुंबईचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ, विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला


Anant Chaturdashi 2022 : पुढच्या वर्षी लवकर या...! आज अनंत चतुर्दशी, दहा दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप, विसर्जन मिरवणुकीची धूम