मुंबई : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर पोहायला गेलेले चौघे जण बुडाल्याची घटना समोरुन आली आहे. यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. दोघांना वाचवण्यात यश आलं असून एक जण अजूनही बेपत्ता आहे.
गुरुवारी संध्याकाळी मुंबईच्या धारावी भागातले चार मित्र गिरगाव चौपाटीवर गेले होते. पोहण्यासाठी समुद्रात पाण्यात ते उतरले, मात्र त्याच वेळी समुद्राला ओहोटी आल्यानं चौघे जण आत ओढले गेले.
स्थानिक मच्छिमारांच्या हे लक्षात येताच, त्यांनी तातडीनं समुद्रातून दोघांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं. त्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या वतीनं शोध घेतल्यानंतर एकाचा मृतदेह सापडला, तर अद्यापही एक जण बेपत्ता आहे.