मुंबई : मुंबईत घाटकोपरमध्ये एकाच कुटुंबातील दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. घाटकोपर पूर्वमधील कामराजनगर भागात पहाटे नंदन इंदर यादव (वय साडेतीन वर्ष) आणि किशोर यादव (वय साडेचार वर्ष) या दोघांचा मृत्यू झाला. तर रोहित (वय 12 वर्ष) आणि कृष्ण (वय 8 वर्ष) यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


पहाटे तीनच्या सुमारास नंदनला रुग्णलयात आणलं, तेव्हा तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. तर सकाळी आठ वाजता किशोरला राजवाडीत आणलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घरातील अन्नातून विषबाधा झाल्याने दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर आजारी असल्याने मुलांचा मृत्यू झालाचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र हे कुटुंब गरीब असून त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.