Mumbai : 29 जानेवारी 2022 रोजी माटुंगा येथील भाऊ दाजी रोडवरील श्री. सिद्धी अपार्टमेंटसमोर मॉकड्रील दरम्यान एक अपघात झाला होता. या अपघातात अग्नीशमन दलाचे तीन जवान जखमी झाले होते. त्यातील सदाशिव कर्वे हे गंभीर जखमी झाले असून त्यांचे काल 3 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले आहे. 


भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात (आज) 4 फेब्रुवारी 2022 रोजी सदाशिव कर्वे यांचे पार्थिव मानवंदना देण्यासाठी व अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील भायखळा मुख्यालयात ठेवण्यात आलेल्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.





सदाशिव कर्वे यांना या अपघातात आपला पाय गमवावा लागला होता. त्यांच्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु त्यांची काल 3 फेब्रुवारी 2022 रोजी प्राणज्योत मालवली. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांनी उपप्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांना यापूर्वीच दिले आहे.


सदाशिव धोंडीबा कार्वे यांचे वय 55 होते. वडाळा येथील अग्निशमन केंद्रात ते यंत्रसंचालक होते. कार्वे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब आहे. मुंबईतील अग्निशमन विभागाच्या मुख्यालयात शुक्रवारी सकाळी त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यांच्यावर सातारा येथील मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहितीही अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.


संबंधित बातम्या


Marathi : मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याला विलंब का? ही आहेत कारणं


अमृता फडणवीस म्हणतात, मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट; महापौरांनी प्रत्युत्तरात म्हटले...


मुंबईत काँग्रेसची स्वबळाची समीकरणं फिरणार? काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेसोबत युती करण्यास इच्छुक!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha