आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप यांसह सर्वच सत्ताधाऱ्यांवर टीका करणारे व्यंगचित्र राज ठाकरेंनी फेसबुक पेजवरुन प्रसिद्ध केले होते. त्यामुळे यावेळी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतले आहे.
सत्तेतून बाहेर पडण्याचे जे इशारे उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या नेत्यांकडून कायम दिले जातात, तो धागा पकडत राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढलं आहे.
सौजन्य - राज ठाकरे यांचं फेसबुक पेज
‘परत सांगतो सोडून जाईन’ असे नाव या व्यंगचित्राला देऊन, भाजप नावाची एक व्यक्ती दाखवण्यात आली असून, उद्धव ठाकरे तिच्या गळ्याला टांगताना दिसत आहेत. ‘सोडू?’ असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत, तर भाजप नावाची व्यक्ती ‘अहो, पण आम्ही कुठे धरलंय तुम्हाला?’ असे म्हणत आहे. त्यामुळे एकंदरीत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची स्थिती राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून मांडली आहे आणि त्यावर भाष्य केले आहे.