मुंबईत टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलच्या तळमजल्यावर आग
एबीपी माझा वेब टीम | 11 Feb 2017 11:28 AM (IST)
मुंबई : मुंबईतल्या परळ परिसरात असलेल्या टाटा मेमोरियल कँसर रुग्णालयात आग लागली आहे. हॉस्पिटलच्या तळमजल्यावर भीषण आग लागली असून आग विझवण्याचं काम सुरु आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. चार वॉटर टॅन्करही घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्याचं काम सुरु आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सुदैवाने या आगीत कोणत्याही जीवित किंवा वित्तहानीचं वृत्त नाही.