मुंबई : कोरोनाच्या बचाव यापासून लसीकरण सध्या हाच एक पर्याय आहे. मात्र याचा सुद्धा फायदा घेऊन लोकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात मुंबईत केली जात होती. शहरात विविध ठिकाणी बोगस लसीकरण शिबिर आयोजित करून फसवणूक करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मुंबईच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये सात गुन्हे दाखल आहेत. तर या प्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून एसआयटी सुद्धा नेमण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे पूर्ण विश्व त्रस्त आहे अजूनही यावर उपचार सापडला नाही. मात्र लसीकरण केल्यामुळे या जीवघेण्या आजाराला लांब ठेवण्यास मोठी मदत होत आहे. मात्र आता काही लसीकरण याच्या नावावर सुद्धा पैसे कमवून लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. अशाच एका टोळीला जी मुंबईमध्ये लसीकरणाच्या नावावर लोकांची फसवणूक करत होती त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी मुंबईमध्ये सात गुन्हे दाखल असून एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कसे फसवणूक करायचे?
एखाद्या कंपनीला किंवा सोसायटीला लसीकरण करून घ्यायचा आहे का याची माहिती गोळा करायचे. त्यानुसार कॅम्प आयोजित करून या टोळी कडून लसीकरण केलं जायचं.लसीकरण करण्यासाठी लसींचा पुरवठा हा शिवम हॉस्पिटल चारकोप कांदिवली येथून केला जात होता याचे मालक शिवराज पटारीया आणि त्यांची पत्नी नीता पटारीया आहेत. यामध्ये मुख्य आरोपी महेंद्र सिंह हा आहे ज्याने हा सगळा प्लॅन आखला.
लोकांनी आत्तापर्यंत मुंबईतील विविध ठिकाणी अशाप्रकारे बोगस लसीकरण केला आहे.
1. आदित्य कॉलेज बोरवली येथे 225 लोकांचा लसीकरण केलं.
2. मानसी शेयर्स अंड स्टॉक शिंपोली बोरिवली येथे एकूण 514 लोकांचा लसीकरण केलं.
3. पोद्दार एज्युकेशन सेंटर परळ येथे 207 लोकांचा लसीकरण करण्यात आलं..
4. टिप्स कंपनी अंधेरी येथे 151 जणांचे लसीकरण करण्यात आला.
5. टीप्स कंपनी खार येथे 206 लोकांचे लसीकरण करण्यात आला.
6. बँक ऑफ बरोडा लिंक रोड मालाड येथे 40 लोकांचे लसीकरण करण्यात आले.
एकूण 1343 लोकांचे बोगस लसीकरण या टोळीने केले आहे.अटक करण्यात आरोपींमध्ये महेंद्र प्रताप सिंह (वय 39), संजय गुप्ता (वय 29), चंदन सिंह (वय 32), नितीन मोंडे (वय 32), मोहंमद करीम अकबर अली (वय 19), गुडिया यादव (वय 24), शिवराज पटारिया (वय 61), नीता शिवराज पटारिया (वय 60), श्रीकांत माने (वय 39) आणि सीमा अहुजा (वय 42) यांचा समावेश आहे. एकदा लसीकरण करून त्या रिकाम्या बाटलीत पुन्हा पाणी भरून किंवा ग्लुकोज भरून ते लसीकरणासाठी वापरले जात होतं. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 200 पेक्षा अधिक लोकांचे जवाब नोंदवले आहेत. तर या आरोपींकडून 12 लाखांपेक्षा अधिक रक्कम जप्त केली आहे. 114 बनावट प्रमाणपत्रही जप्त करण्यात आले आहेत.
विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, नागरिकांना काळजी करण्याची गरज नाही तसंच प्राथमिक तपासात यांनी दिलेल्या लस्सीमध्ये काय हानिकारक द्रव्य होते का हे अजून स्पष्ट झाला नाही आहे. मात्र पोलिस या प्रकरणी तपास करत आहे. तसेच नागरिकांना सुद्धा पोलिसांनी आवाहन केला आहे की जर त्यांच्या निदर्शनास असा एखादा बनावट कॅम्प आला किंवा त्यांना संशय असला तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.