मुंबई : मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन रोड या स्टेशनच्या नामांतराला अखेर मंजुरी मिळाली आहे. एल्फिन्स्टन स्टेशनचं नवं नाव आता प्रभादेवी असं नामकरण झालं आहे.


एल्फिन्स्टन रोड स्टेशनचं नामकरण प्रभादेवी करावं अशी मागणी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते सातत्याने करत होते. त्यांच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे.

1991 साली दिवाकर रावते महापौर असताना मुंबई महापालिका सभागृहात पहिल्यांदा हा नामांतराचा ठराव मांडण्यात आला होता. तेव्हापासून सुरु असलेल्या पाठपुराव्याला दोन दशकांनंतर यश आलं आहे.



प्रभादेवी स्टेशनचं नवीन कोड इनिशिअल पीबीएचडी (PBHD)असेल.

काही दिवसांपूर्वीच सीएसटी अर्थात छत्रपती शिवाजी टर्मिनसचं नामांतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं झालं होतं.