मुंबईत ज्येष्ठ नागरिकांकडून 'इको मोक्ष'ची बांधणी
एबीपी माझा वेब टीम | 23 Oct 2016 11:08 PM (IST)
मुंबई : मुंबईतल्या सांताक्रुझमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी 'इको मोक्ष' ची बांधणी केली. लोकसहभागातून तब्बल 3 कोटी रुपये गोळा करुन 'इको मोक्ष'ची स्थापना करण्यात आली आहे. राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते याचं लोकार्पण करण्यात आलं. सांताक्रुझ पश्चिम येथील स्मशानभूमी परिसरातच इको मोक्षची बांधणी केली आहे. पीएनजी पाईप गॅसवर चालणाऱ्या दोन दाहिन्या उभारण्यात आल्या असून याठिकाणी प्रशस्त सभागृह आणि आसनव्यवस्थाही उभारण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे लाकडाची व वीजेची बचत होणार असून वायू प्रदूषणही होणार नाही. लोकसहभागातून उभा राहिलेला मुंबईतला हा पहिलाच प्रकल्प आहे. या कार्य़क्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह उपमहापौर अलका केरकर आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.