मुंबई : राणीच्या बागेत दक्षिण कोरियाहून आणलेल्या आठ पेंग्विनपैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू बालहट्टामुळे झाल्याचा घणाघात काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

नितेश राणे यांनी ट्वीट करत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ट्वीटमध्ये नितेश यांनी वीरमाता जिजाबाई उद्यानाकडून पेंग्विनच्या मृत्यूबाबत प्रसारित केलेल्या परिपत्रकाची प्रत जोडली आहे.

https://twitter.com/NiteshNRane/status/790163484281597956
दक्षिण कोरियाच्या सेऊलमधील कोएक्स अॅक्वेरिअममधून मुंबईतील जिजामाता उद्यानात एकूण आठ पेंग्विन आणण्यात आले होते. यापैकी एका मादी पेंग्विनला यकृतातील जीवाणू संसर्गामुळे जीव गमवावा लागल्याचं समोर आलं आहे. रविवारी सकाळी 8.15 च्या सुमारास पेंग्विनचा मृत्यू झाला.

26 जुलै 2016 रोजी पहिल्या टप्प्यात आणण्यात आलेल्या या पेंग्विन्समध्ये 3 नर आणि 5 मादींचा समावेश आहे. राणीच्या बागेतील क्वारेंटाईनमध्ये सर्व पेंग्विनना ठेवण्यात आलं होतं. दक्षिण कोरियासारखं तापमानही राणीच्या बागेत तयार करण्यात आलं आहे. वॉटर क्वॉलिटीही पेंग्विनला अनुकूल ठेवण्यात येत आहे. या पेंग्विनची काळजी घेण्यासाठी एका ऑस्ट्रेलियन कंपनीला जवळपास 8 कोटींचं कंत्राट देण्यात आलं.

संबंधित बातम्या :


राणीच्या बागेतील पेंग्विनचा संसर्गामुळे मृत्यू