Mumbai Latest Crime News : मायानगरी मुंबईमध्ये एक घृणास्पद (Mumbai Crime) घटना उघडकीस आली आहे. एका चालकानं 22 वर्षीय विद्यार्थींनीसमोर हस्तमैथुन (flashing private parts) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आज त्या आरोपीला गिरगाव न्यायालयात (Girgaon Metropolitan Magistrate Court ) हजर करण्यात येणार आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयातील उच्च स्तरीय अधिकाऱ्याच्या 22 वर्षीय मुलीसमोर हस्तमैथुन (flashing private parts) करणाऱ्याला चालकाला ताडदेव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गाडीत बसलेल्या आरोपीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने 22 वर्षीय मुलीला जवळ बोलावलं होतं. त्यानंतर त्यानं अश्लिल चाळे करण्यास सुरुवात केली. मुलीला संशय येताच मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. चालकानं त्या तरुणीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी मुलीने आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. 


सोमवारी रात्री (6 फेब्रुवारी 2023) ही धक्कादायक घटना घडली होती. ताडदेवमधील रेसकोर्सजवळील गव्हरमेंट कॉलनीच्या आसपास हा प्रकार घडल्याचं समोर आले आहे. मुलीनं ताडदेव पोलिसांत याबाबतची तक्रार दाखल केली. मुलीने तो व्हिडीओ पोलिसांना दाखवला. त्या व्हिडीओच्या मदतीने पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या अवळल्या. पोलिसांनी (Police) आज अंधेरीमधून आरोपीला अटक केली. त्या आरोपीचं नाव अब्दुल अहमद गौस मोहंमद रहिनी असं असल्याचं समजतेय. आरोपी सर्व्हिस सेंटरमध्ये काम करत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. त्या आरोपीला आज पोलीस गिरगाव न्यायालयात (Girgaon Metropolitan Magistrate Court ) हजर करणार आहेत.  


आणखी वाचा :
Mumbai Crime : बॉडी बिल्डर बनण्यासाठी मीरा रोडमधील तरुण बनला दुचाकी चोर, दहा दुचाकी जप्त