VIDEO : रहिवासी भागात घुसलेल्या बिबट्याला कुत्र्यांनी पळवलं
एबीपी माझा वेब टीम | 03 Mar 2017 08:55 AM (IST)
मुंबई : मुंबईतील मालाडच्या एका रहिवासी भागात बिबट्या आढळून आला. विशेष म्हणजे 3 ते 4 कुत्र्यांनी बिबट्याचा धीराने सामना करत त्याला पळवून लावलं. मालाडच्या गिरीकुंज सोसायटीमध्येमंगळवारी रात्री घडलेला हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गिरीकुंज सोसायटीचा मागील भाग डोंगराळ आहे. तिथूनच बिबट्या आला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. बिबट्या सोसायटीमध्ये नेमका कसा शिरला याचा वनविभागातर्फे शोध सुरु आहे. मात्र सोसायटीमध्ये बिबट्या घुसल्याने रहिवाशांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. पाहा व्हिडीओ