Raj Thackeray : उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यानंतर आता राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.  अदानींनाच (Adani Group) मुंबईतील (mumbai) मोठा प्रकल्प कसा मिळाला? त्यांच्यामध्ये असे काय आहे, की विमानतळ हाताळणं असो किंवा कोळसा... सर्व त्यांनाच कसं मिळतं? भारतात दुसऱ्या मोठ्या कंपन्या नाहीत का? असा सवाल आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी उपस्थित केला. त्याशिवाय उद्धव ठाकरेंच्या मोर्चावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.


अदानींकडे काय? सर्व प्रकल्प त्यांनाच का मिळतात? 


मुंबईत पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मुंबईमध्ये एक मोठा प्रकल्प येतोय.  तो परस्पर अदानींना (mumbai dharavi redevelopment project) का दिला? हा प्रश्न आहे. अदानी यांच्यामधे काय आहे की त्यांच्याकडेच विमानतळ, कोळसा, रिडेव्हलपमेंट सगळे मोठे प्रोजेक्ट आहेत. मुंबईत अनेक मोठे कंत्राटदार आहेत. त्यांना निविदा काढून प्रकल्प द्यावा ना? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 


ठाकरे गटाच्या मोर्चावर प्रश्न... 


प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी धारावीमध्ये काढण्यात येत असलेल्या मोर्चावर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, "कंत्राट काढून १० महिने झाले, आज का मोर्चा काढला जातोय ? की सेटलमेंट होत नाही म्हणून मोर्चा काढला जातोय का? हे तुम्ही त्यांनाच विचारा."


रिडेव्हलपमेंटसाठी एक प्लान असतो, तो त्यांच्याकडे आहे का? हे अदांनीना विचारा.शाळा किती, ओपन स्पेस किती? सगळं माहिती पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. 


मनसेची लोकसभेची तयारी - 


मनसेनं लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली. ते म्हणाले की, आमची लोकसभेसंदर्भात बैठक झाली.कोणते मतदारसंघ लढवायचे त्यासंदर्भात सखोल चर्चा झाली. महानगरपाालिका निवडणुका 2025 ला होतील, असे उपहासात्मक म्हणाले. कारण सध्या देशात मेरी मर्जी सुरू आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. 



नैना प्रकल्पाचा विरोध करणारे गावांचे शिष्टमंडळ राज ठाकरे यांच्या भेटीला - 


नैना प्रकल्पाचा विरोध करणारे गावांचे शिष्टमंडळ राज ठाकरे यांच्या भेटीला आले. पनवेल, पेण आणि उरण तालुक्यात होऊ घातलेल्या नैना प्रकल्पाच्या विरोधात येथील ग्रामस्थांनी उग्र आंदोलन सुरू केले आहे. तसेच 6 डिसेंबरपासून सिडकोविरोधात काही प्रकल्पग्रस्त नेते मंडळी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मात्र सरकार प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती राज ठाकरे यांच्याकडे आपले प्रश्न घेऊन आले आहेत. 


सिडकोतर्फे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या २५ किलोमीटरच्या परिघात नैना प्रकल्प राबवला जात आहे. पनवेल, उरण आणि पेण तालुक्यातील गावे बाधित होत आहेत. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन सिडकोतर्फे जी मोबदल्यात जमीन दिली जात आहे, त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.यापूर्वी या शिष्टमंडळाने शरद पवारांची देखील भेट घेतली होती. आता राज ठाकरेंच्या भेटीनंतर तरी त्यांचा प्रश्न सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.