विस्टाडोम कोच जोडलेली जनशताब्दी दादरहून मडगावला रवाना
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 18 Sep 2017 07:34 AM (IST)
भारतीयांप्रमाणेच परदेशी पाहुण्यांचा रेल्वेचा प्रवास आणखी सुखकर व्हावा आणि पर्यटन विकासाला चालना मिळावी, यासाठी भारतीय रेल्वेने नव्या विस्टाडोम कोचचा अंतर्भाव असलेली ट्रेन सुरु केली.
फोटो सौजन्य : भारतीय रेल्वे
मुंबई : अत्यंत आधुनिक आणि आलिशान असणारा विस्टाडोमचा एक डबा आज कोकणात जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. ही गाडी मुंबईतील दादर स्थानकावरुन मडगावच्या दिशेने रवाना झाली आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच पारदर्शक डबा असलेली ही गाडी रुळांवर धावत आहे. विस्टाडोम डब्याचं तिकीट विमान प्रवासाइतकंच आहे. तुम्हाला या डब्यातून मुंबई ते गोवा प्रवासासाठी दोन हजार 325 रुपये मोजावे लागतील.