Aryan Khan Bail LIVE Updates : अखेर सुटका! आर्यन खान जामिनावर तुरुंगाबाहेर; पाहा प्रत्येक अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

Aryan Khan Bail LIVE Updates : आर्यन खानला जामीन; प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज सुटकेची शक्यता; पाहा प्रत्येक अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 30 Oct 2021 11:17 AM
आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतरची कारागृहातील कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण

LIVE UPDATE : आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतरची कारागृहातील कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण, कोणत्याही क्षणी आर्यन खान तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता 

आर्यन खानची सुटका होणार, कोणत्याही क्षणी आर्यन आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता

आर्यन खानची सुटका होणार असून या संदर्भातील प्रत्येक अपडेट... 

कोणत्याही क्षणी आर्यन खान तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता 

कोणत्याही क्षणी आर्यन खान तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता 

10 ते 12 दरम्यान आर्यन खानच्या सुटकेची शक्यता; कारागृह अधिक्षकांची माहिती

आर्थर रोड तुरुंगात आर्यन खानच्या जामीन अर्जाची प्रक्रिया सुरु झाली असून 10 ते 12 वाजेपर्यंत आर्यन खान तुरुंगातून बाहेर पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती कारागृह अधिक्षकांनी एबीपी माझाला दिली आहे. 

जामीनासाठीची सर्व औपचारिकता पूर्ण, काही वेळातच आर्थर रोड जेलमधून सुटण्याची शक्यता

Aryan Khan Bail : किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आज आर्थर रोड कारागृहातून बाहेर येणार आहे. परवा आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर काल त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पडली. पण जामिनाची प्रत तुरुंगात वेळेत पोहचली नाही म्हणनू आर्यनची कालची रात्र तुरुंगातच गेली. आज पहाटे 5.30 वाजताच आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून जामीन पत्रपेटी उघडण्यात आली. त्यामुळे आता आर्यनच्या जामिनासाठीच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सकाळी 8-9 वाजता आर्यनचा तुरुंगवास संपण्याची शक्यता आहे. सकाळी 8-9 दरम्यान आर्यन त्याचं घर मन्नत बंगल्याकडे रवाना होईल असं कळतंय. 

आर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त

आपल्या लेकाला घेण्यासाठी थोड्याच वेळात शाहरुख खान आर्थर रोडला पोहोचणार आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आर्यनची कोणत्याही क्षणी सुटका होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर आर्थर रोड तुरुंगाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

आर्यन खानच्या जामीनाची प्रक्रिया पूर्ण

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खानला गुरुवारी जामीन मंजूर झाला. ड्रग्स प्रकरणी अडकलेला आर्यन खानची आज कारागृहातून सुटका होऊ शकते. दोन दिवसांपूर्वी जामीन मिळूनही आर्यनची अद्याप कारागृहातून सुटका झालेली नाही. आर्यन खानच्या सुटकेबाबत आर्थर रोड जेल प्रशासननं म्हटलं की, का दिवसभरात शेवटच्या वेळी जामीन अर्जाची पेटी उघडण्याच्या वेळापर्यंत आर्यन खानची कागदपत्र पोहोचले नव्हते, त्यामुळे आर्यनची सुटका होऊ शकली नव्हती. जेल प्रशासनानं म्हटलं की, नियमांनुसार ठरलेल्या वेळेप्रमाणे जामीनाचे कागद पोहोचले नव्हते. त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, आतापर्यंत आर्यन खानचा कारागृहातील व्यवहार चांगला असल्यामुळे शनिवारी सकाळपर्यंत त्यांची कारागृहातून सुटका होऊ शकते. 

आर्यन खानसाठी जुही चावला जामीनदार, थोड्याच वेळात आर्यन खान कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता

Aryan Khan Bail : किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आज आर्थर रोड कारागृहातून बाहेर येणार आहे. परवा आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर काल त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पडली. पण जामिनाची प्रत तुरुंगात वेळेत पोहचली नाही म्हणनू आर्यनची कालची रात्र तुरुंगातच गेली. आज पहाटे 5.30 वाजताच आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून जामीन पत्रपेटी उघडण्यात आली. त्यामुळे आता आर्यनच्या जामिनासाठीच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सकाळी 8-9 वाजता आर्यनचा तुरुंगवास संपण्याची शक्यता आहे. सकाळी 8-9 दरम्यान आर्यन त्याचं घर मन्नत बंगल्याकडे रवाना होईल असं कळतंय. 

पार्श्वभूमी

जवळपास साडेतीन वाजता जारी केले आदेश 

क्रूझ ड्रग प्रकरणी बॉम्बे हायकोर्टाच्या वतीनं आर्यन खान, मॉडल मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांचा जामीन रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आज हायकोर्टाच्या वतीनं जवळपास साडेतीन वाजता ऑर्डर जारी करण्यात आले. आर्यनच्या सुटकेचे आदेश जारी करत हायकोर्टानं म्हटलं की, त्यांना एक लाख रुपयाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तत्सम रकमेचे एक किंवा दोन जामीन भरल्यावर सोडण्यात येईल.

जामीन दिला, पण काही अटी कायम 

जामीन देण्यासोबतच उच्च न्यायालयानं आर्यन खानला काही अटीं आणि नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. अटींनुसार, उच्च न्यायालयानं आर्यन खानला इतर कोणत्याही आरोपीसोबत संपर्क साधता येणार नाही. याव्यतिरिक्त स्पेशल कोर्टाच्या कारवाईला कोणत्याही प्रकारे अडथळे निर्माण होतील, असं काहीही आर्यन खाननं करु नये. तसेच जामीन अर्ज मंजूर करताना उच्च न्यायालयानं आर्यन खानला आपला पासपोर्ट स्पेशल कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. 

... अन्यथा जामीन रद्द होणार 

जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान, म्हटलं गेलं की, आर्यन खान उच्च न्यायालयानंच्या परवानगीशिवाय देश सोडू शकत नाही. या दरम्यान, उच्च न्यायालयानं हेदेखील म्हटलं की, आर्यन खान जर मुंबईतूनही बाहेर जाणार असेल तर याबाबतची माहिती त्यानं या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांना आधीच देणं आवश्यक आहे. या दरम्यान, उच्च न्यायालयानं हेदेखील म्हटलं की, जर आर्यन खाननं अटी मान्य करुन त्यांचं पालन केलं नाही, तर मात्र त्याचा जामीन रद्द होऊ शकतो. 

शाहरुखच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण 

आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानच्या चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. शाहरुख खानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमा झाली होती. शाहरुखच्या फॅन्सनी त्यांच्या घराबाहेर येत आनंद साजरा केला. एएनआयनं जारी केलेल्या व्हिडीओनुसार, शाहरुख खानचा लहान मुलगा अबराम आनंदी असून तो घराबाहेर जमलेल्या लोकांना अभिवादन करत होता. 

दरम्यान, मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया या आलिशान क्रुझवर एनसीबीने 2 ऑक्टोबरला धाड टाकली होती. यावेळी ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा आणि अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. आर्यनसह अरबाज आणि मूनमून धमेचाच्या वतीनं मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली.

मुलगा आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खाननं घेतली वकिलांची भेट 

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, मॉडेल मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर 26 व्या दिवशी जामीन मिळाला. सध्या त्यांची सुटका होण्यासाठी एक ते दोन दिवस लागतील. मात्र, याबाबत अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुसरीकडे आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी फोटो शेअर केला असून या फोटोमध्ये शाहरुख खान हसताना दिसत आहे.

आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले, "आर्यन शाहरुख खानला अखेर हायकोर्टातून जामीन मिळाला आहे. 2 ऑक्टोबर रोजी अटकेच्या पहिल्या दिवसापासून या प्रकरणात कोणताही पुरावा नाही, कोणताही उपभोग नाही, कोणताही कट नाही. आणि आता काहीही नाही. ." आमची प्रार्थना न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी मान्य करून आर्यनला जामीन मंजूर केल्याचे वकिलांनी सांगितले.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबई किनार्‍यावरील एका क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर अटक करण्यात आली होती. न्यायमूर्ती एन डब्ल्यू सांबरे यांच्या एकल खंडपीठाने या प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही जामीन मंजूर केला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.