मुंबई :  सेवेतून बडतर्फ  झाल्यानंतर अध्यात्मिक धर्मगुरू झालेल्या पोलीस हवालदारवर आता पुन्हा एकदा बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. काहीच दिवसापूर्वी ठाण्यातील कळवा पोलिसांनी पोलीस हवालदार गोकुळ जाधव ( वय 50) आणि त्याचा मुलगा अनिरुद्ध जाधव( वय 21) याला एका महिलेच्या बलात्कार प्रकरणी अटक केले होते. मात्र आत एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने ही तक्रार दिली आहे. महाविद्यालयीन तरूणीवर 2021 मध्ये कोरोना काळात अत्याचार केले आहे.


गोकुळ जाधव आणि त्याच्या मुलाने लैंगिक अत्याचाराची केल्याचा जबाबत सांगितलं असून तक्रार केली आहे. पीडितेची आई जाधवची भक्त होती आणि या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आरोप केला आहे की, तिच्या आईवर देखील पिता-पुत्राच्या जोडीने बलात्कार केला आणि ब्लॅकमेल केले. या भोंदूबाबाच्या छळामुळे तिला इतका त्रास झाला की ती राजस्थानला स्थलांतरित झाली. कळवा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदाचा कलम अंतर्गत गुन्हा दाखल आहे.


 पोलिस सेवेतून बडतर्फ


गोकुळ जाधव हा नवी मुंबई पोलिसात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत होता. त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. याआधीही त्याला नेरुळ पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याच्यावर खंडीचा सुद्धा गुन्हा दाखल होता. तो एका नवी मुंबईतील राजकीय नेत्याचा झेड प्लस सेक्युरिटीत ड्युटीवर सुद्धा होतो. 


ठाण्यातील विटावा येथे राहणाऱ्या गोकुळला पोलिस खात्यातून निलंबीत करण्यात आल होते. गोकुळ नवी मुंबई पोलीस दलात हवलदार होता. दहा वर्षापूर्वी त्याचे पोलिस खात्यातून निलबन झाले. त्यानंतर त्याने आध्यात्मिक गुरूची भूमिका स्वाकारली. गोकुळवर वेगवेगळ्या पोलिस स्थानकात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या अगोदर देखील  बलात्कारप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. 


15 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार


मुली, महिलांवर अत्याचारात वाढ होत असताना आता पुन्हा एकदा जवळच्या, ओळखीच्या लोकांकडून अत्याचाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी 15 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार  करण्यात आला आहे.  चाकूचा धाक दाखवून तसेच आईला जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. मुलुंड पोलिसांनी सामुहिक बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी  21 वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे.  तर दुसऱ्या आरोपीच्या शोधात पोलिसांचे पथक परराज्यात रवाना झाले आहे.  गुंगीच औषध देऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे एफआयआरमध्ये नमुद करण्यात आले आहे. 


हे ही वाचा:


उज्जैनमध्ये 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं खळबळ, या प्रकरणात मागील 48 तासांत काय-काय घडलं?