मुंबई :  यंदाचे वर्ष हे निवडणुकांच वर्ष आहे. या सर्व निवडणुकांमध्ये आणखी एका निवडणुकीची चुरस समोर आलेली आहे  ती म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनची (Mumbai Cricket Association). या संस्थेचे  अध्यक्ष अमोल काळे (Amol Kale) यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा या पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे.  या निवडणुकीच्या रिंगणात आता थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ही  उतरु पाहत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकीची चुरस पाहायला मिळणार आहे. 


 मुंबई क्रिकेट क्लबच्या अध्यक्षपदाची धुरा शेषराव वानखेडे,  मनोहर जोशी, विलासराव देशमुख, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, आशिष शेलार या दिग्गज नेत्यांनी सांभाळली आहे. त्याच अध्यक्ष पदाची भुरळ  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनाही पडू लागलीय. माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून नाना पटोले यांची निवड करण्यात आली आहे. 


कशी होते मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक?



  • निवडून आलेले पाच कार्यकारी मंडळातील सदस्य असतात

  • प्रत्यक्ष निवडणून आलेले सदस्य- 9

  • 3 नाॅमिटेड सदस्यांयापैकी 1 महिला प्रतिनिधी, 1 पुरुष प्रतिनिधी, 1 क्रिकेट प्रतिनिधी  आणि कॅगचा 1 प्रतिनिधी


कोणाला मतदान करता येते?


मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत कोणाला मतदान करता येते.  मुंबईत एकूण 329 क्लब आहेत. या  क्लबच प्रतिनिधित्व मुंबई क्रिकेट असोसिएशन करते. प्रत्येक क्लबचा 1 सदस्य प्रतिनिधित्व करत मतदान करत असतात. त्याचसोबत मुंबईमधून राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळलेले आहेत त्यापैकी  40 सदस्य असतात असे  एकूण 369  मतदार आहेत.  याच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी नाना पटोले माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून एमसीएमच्या निवडणुकीत दाखल झालेले आहेत.  मागील निवडणुकीत शरद पवार आणि अशिष शेलार पॅनलचे 11 सदस्य निवडून आले होते. तर क्रिकेटर संदीप पाटील यांच्या पॅनलचे  सदस्य निवडून आले आहेत. 


नाना पटोलेंची उडी


 राजकारणात वेगवेगळ्या पक्षाचे हे नेते असते तरी एमसीएच्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि आशिष शेलार यांचा एकत्रित पॅनल पाहायला मिळाला होता. आता ही आशिष शेलार,  जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, मिलींद नार्वेकर आणि आता नाना पटोले यांनी उडी घेतलीय. 


कोणाचा विजय होणार?


एखाद्या चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्रीला ग्लॅमर आहे. तेवढच ग्लॅमर क्रिकेटरांना  पाहायला मिळतय. त्यामुळे सहाजिकच आहे या क्रिकेटरांचा नेतृत्व करण्याची अनेक राजकीय नेत्यांना भुरळ पडलेली पाहायला मिळते  तीच भुरळ आता नाना पटोले यांना ही पडलेली दिसतेय. त्यामुळे या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत काय गणित जुळतात आणि कोणाचा विजय होतो हे पाहणं महत्वाचं राहणार आहे.