मुंबईच्या विशेष कोर्टाचं विजय मल्ल्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट
एबीपी माझा वेब टीम | 18 Apr 2016 04:03 PM (IST)
मुंबई : ईडीच्या समन्सना केराची टोपली दाखवणाऱ्या विजय मल्ल्याविरोधात मुंबईच्या सत्र न्यायालयान आजामीनपात्र वॉरंट काढलं आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या एकाही समन्सला विजय मल्ल्यानं सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळं ईडीनं सत्र न्यायालयात खटला दाखल केला. त्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान सत्र न्यायालयानं विजय मल्ल्याविरोधात आजामीनपत्र वॉरंट काढलं आहे. दरम्यान ईडीनं आतापर्यंत दोन वेळा समन्स बजावून मल्ल्याला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र त्या समन्सची विजय मल्ल्यानं दखल घेतली नाही. देशातील 17 बँकांचं जवळपास 9 हजार कोटींचं कर्ज थकवल्याचा विजय मल्ल्यांवर आरोप आहे. आपल्याविरोधात कारवाईचा फास आवळला जातोय हे समजताच विजय मल्ल्यानं लंडनला पळ काढला आहे.