Mumbai Coronavirus Update : कोरोनानं मुंबईची काळजी वाढवली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोना रुग्णांचा उद्रेक होत असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत दिवसभरात 20 हजारांच्या घरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली तर लॉकडाऊन लावावा लागेल, असे संकेत आयुक्त इक्बाल चहल यांनी दिले आहेत. काल (बुधवारी) मुंबईत दिवसभरात तब्बल 15 हजार 166 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे का? असा प्रश्न आता सर्वांना सतावू लागला आहे. 


पुढील आठवडा मुंबईसाठी अधिक काळजीचा आहे. मुंबईत पुढील तीन ते चार दिवसांत कठोर निर्बंध लावण्याबाबर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. मुंबईत तिसरी लाट धडकली असून रोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यामुळे रोज वाढणारी रुग्ण संख्या मुंबईसाठी चिंतेची बाब ठरत आहे. पुढील चार दिवसांत वाढ होणाऱ्या रुग्ण संख्येवर लक्ष असून त्यानंतर कठोर निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


दुसरीकडे ज्या वेगानं कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, ती पाहून सरकार आणि प्रशासनाची झोप उडालीय. राज्यात काल दिवसभरात 26 हजार 538 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत देशात तब्बल तब्बल 71 हजार 397 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 325 जणांचा मृत्यू झाला आहे. 


मुंबईत 1 डिसेंबर रोजी कोरोना बाधित 108 रुग्ण आढळले होते. 5 डिसेंबरला 213, 11 डिसेंबरला 256, 21 डिसेंबरला 327, 25 डिसेंबरला 757, 29 डिसेंबरला 2510, तर 1 जानेवारीला 8063 रुग्ण तर 4 जानेवारीला दहा हजारांचा टप्पा ओलांडून 10 हजार 860 इतक्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  काल दिवसभराती हिच रुग्णसंख्या उच्चांक गाठत 15166 वर पोहोचली आहे. 


मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?


देशासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्येही कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झालेल्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच जर मुंबईतील दैनंदिन रुग्णांचा आकडा 20 हजारांच्या पार पोहोचला तर मुंबईत कठोर निर्बंध लादण्याचा विचार केला जाऊ शकतो, असा इशारा मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. 


सध्या मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येची समोर येणारी आकडेवारी काळजाचा ठोका चुकवणारी आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 15 हजार 166 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तसेच तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 714 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत 61 हजार 923 सक्रिय रुग्ण आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह