मुंबई : मुंबईत मागील दोन दिवसांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत काहीशी वाढ दिसून आली आहे. मुंबईत आज  2116 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4293 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 66 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 38 हजार 859 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 


मुंबईत आतापर्यंत 6 लाख 27 हजार 373 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.  मुंबईचा रिकव्हरी रेट 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर कोरोना रुग्णांचा दुपटीचा दर 176 दिवसांवर वर गेला आहे. काल मुबंईत 1717 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6082 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 






राज्यात आज 46,781 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. आज राज्यात 46 हजार 781 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले तर 58,805 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 88.01% एवढे झाले आहे. राज्यात आज 816 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे. सध्या राज्यात 36,13,000 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,417 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 5,46,129 सक्रीय रुग्ण आहेत.


राज्यात 18 ते 44 वयोगटासाठीच्या लसीकरणाला तुर्तास स्थगिती


राज्यात लसींचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 18 ते 44 वयोगटासाठीच्या लसीकरणाला तुर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्याची गरज आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना वेळेत दुसरा डोस न दिल्यात पहिला डोसचा प्रभाव होणार नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.


इतर महत्त्वाच्या बातम्या