मुंबई : राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवलं जावं अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची मागणी सर्वच मंत्र्यांनी केली आहे. मात्र लॉकडाऊन बाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते बोलत होते. 


तसेच राज्यात लसींचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 18 ते 44 वयोगटासाठीच्या लसीकरणाला तुर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्याची गरज आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना वेळेत दुसरा डोस न दिल्यात पहिला डोसचा प्रभाव होणार नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. 


मुंबईत ज्येष्ठ नागरिकाचं घरोघरी जाऊन लसीकरण, BMC लवकरच वॉर्डनिहाय लसीकरण कँप सुरु करणार


18 ते 44 वयोगटासाठी उपलब्ध असलेल्या लसी आता 45 वयापेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांना देण्यात येणार आहेत. कोरोना लसीच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहेत, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.


Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नंबरवर हायकोर्टातून थेट कॉल, पुढे काय झालं?


किती लस उपलब्ध आणि कितीची गरज? 


दुसऱ्या डोससाठा नागरिकांना एकूण कोविशिल्डचे 16 लाख डोस बाकी आहेत. तर कोवॅक्सिनचे 4 लाख डोस बाकी आहेत. दुसऱ्या डोससाठी असे एकूण 20 लाख डोसची सध्या गरज आहे. तर आपल्याकडे उपलब्ध लसींमध्ये कोविशिल्ड 7 लाखांपर्यंत डोस तर कोवॅक्सिनचे साधारण 3 लाखांपर्यंत डोस उपलब्ध आहेत. म्हणजेच एकूण 10 लाख डोस उपलब्ध आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. 


AMU Coronavirus Death : अलीगढ मुस्लीम विद्यापीठात कोरोनामुळे 20 दिवसांत 26 प्राध्यापकांचा मृत्यू, नव्या व्हेरिएंटची चाचपणी करण्याची ICMRला विनंती