मुंबई : मुंबईत मागील 24 तासात 1,037 रुग्णांचे निदान झाले आहे. तर  1417 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत मुंबई 6 लाख 55 हजार 425 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर आला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 345 दिवसांवर गेला आहे. 


मुंबईत गेल्या 24 तासात 20 हजार 990 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली, त्यापैकी 1037 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईत सध्या 27 हजार 649 अॅक्टिव रुग्ण आहेत. आज मुंबईत 37 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत मुंबई 14 हजार 708 रुग्णांनी जीव गमावला आहे. 


मुंबईत मास्क न घालणाऱ्यांकडून 55 कोटींचा दंड वसूल


कोरोना काळात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांकडून 23 मे पर्यंत मुंबई महापालिकेने 55 कोटी 56 लाख 21 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे. त्यात मुंबई पोलिस आणि रेल्वेने वसूल केलेल्या दंडाचा समावेश आहे. महानगरपालिकेअंतर्गत 23 मे पर्यंत अधिकाऱ्यांनी 48 कोटी 28 लाख 80 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या गस्ती दरम्यान 6 कोटी 77 लाख 01 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे. कोविड प्रकरणात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणून रेल्वेला मानले जाते. रेल्वेने देखील 50 लाख 39 हजार 200 रुपये दंड वसूल केला आहे.


राज्यात 22,122 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


राज्यात काल  42,320 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 22,122 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 361 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहेत.  दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे.  राज्यात आज एकूण 3,24,580  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  आजपर्यंत एकूण 51,82,592 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.51 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 361 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59 टक्के एवढा आहे.