Corona Vaccination : संपूर्ण देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने पुन्हा एकदा आपली दहशत निर्माण करायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांचे वाढते आकडे समोर येत आहेत. मुंबई महानगरपालिकेकडून लसीकरणाची प्रक्रिया तर सुरूच आहे. नुकतीच 15 ते 18 वयोगटातील मुलांनाही लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अशातच मुंबई महानगरपालिकेच्या या लसीकरण मोहिमेवर ट्रायल लसीकरणामुळे 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपाला आज मुंबई महानगरपपालिकेने ट्वीट करत फटकारले आहे.
या ट्विटमध्ये मुंबई महानगरपालिकेने "सर, आम्ही तुमच्या बायोडेटामध्ये पाहतो की तुम्ही एमबीबीएस आहात. त्यामुळे आम्ही आशा करतो की तुम्ही शेअर केलेल्या प्रतिमेच्या सत्यतेबद्दल तुम्ही योग्य उत्तर देऊ शकाल. आम्ही तुम्हाला तुमचा संपर्क आमच्या DM वर शेअर करण्याची विनंती करतो, असे ट्वीट करत प्रतिउत्तर दिले आहे.
दरम्यान, डॉ. तरुण कोठारी या एम.डी, एमबीबीएस असलेल्या व्यक्तीनं ट्रायल लसीकरणामुळे 15 वर्षीय आर्यबेन गोविंदजीभाई या मुलीचा मृत्यू झाला असा दावा ट्वीट करत केला आहे. यात ट्रायल लस घेऊन मृत्यूचे शिकार बनू नका असे आवाहन देखील कोठारी यांनी केले होते. आता, याच ट्विटला मुंबई महानगरपालिकेने ट्वीट करत फटकारले आहे.
घाटकोपरमध्ये 15 वर्षांच्या मुलीचा लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मुलीच्या कुटुंबाशी संपर्क साधला. चौकशी केल्यानंतर या मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर आले. परंतु, लसीकरणामुळे हृदयविकाराचा झटका आला याचे निदान अजूनही स्पष्ट झाले नाही. दरम्यान, मुलीचे पोस्ट मोर्टम अजूनही झालेले नाही. या दरम्यान कुटुंबाशी संपर्क साधल्यानंतर तिचा मृत्यू लसीकरणामुळे नाही तर हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट केले आहे.
काय म्हणाल्या महापौर ?
घाटकोपरमधील लसीकरणानंतर मृत्यू झालेल्या मुलीच्या प्रकरणाबाबत आरोग्य विभाग चौकशी करत आहे. पोस्टमोर्टम का झाले नाही याबाबत माहिती घेणे सुरु आहे. तसेच मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती घेतली जाईल. मुलीच्या कुटुंबाला मी स्वत: भेटणार आहे. घडलेल्या प्रकरणामुळे लसीकरणाबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
- Coronavirus Cases : गेल्या 24 तासात देशात 2 लाख 68 हजार 833 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 402 जणांचा मृत्यू
- Jallikattu 2022: जल्लीकट्टू खेळादरम्यान उधाळलेल्या बैलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, 80 जण जखमी
- Majha Impact : बापासाठी 'धावणाऱ्या' जिगरबाज लेकी! पारनेरच्या भगिनींना दत्ता मेघेंकडून मदतीचा हात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha