Mumbai Corona Update : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत असल्याचं दिसत आहे. मुंबईतही कोरोनाचा प्रकोप आता बराच कमी होत असल्याचं दिसत आहे. मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून साप्ताहिक कोरोना वाढीचा दर 0.5 वर गेला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 1324 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काल केवळ 4 मृत्यू झाले तर मुंबई उपनगरातील ठाणे जिल्ह्यासह सात उपनगरांमध्ये एकही मृत्यू झालेला नाही. 17 ऑक्टोबर रोजी मुंबई महापालिका क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झालेली नव्हती. 


मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काल 463 रुग्णांची नोंद झाली तर 24 तासात 558 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत मुंबईत 728696 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 4550 सक्रिय रुग्ण आहेत.  


Coronavirus : आंतरराष्ट्रीय प्रवाशांना भारतात निगेटिव्ह RT-PCR रिपोर्ट अनिवार्य


 27 जिल्हे आणि 23 महापालिका क्षेत्रांमध्ये कोरोनामुळं एकही मृत्यू नाही
काल बुधवारी महाराष्ट्रातील तब्बल 27 जिल्हे आणि 23 महापालिका क्षेत्रांमध्ये कोरोनामुळं एकही मृत्यू झाला नसल्याचं सरकारी आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे. मुंबई उपनगरातील ठाणे जिल्ह्यासह सात उपनगरांमध्ये एकही मृत्यू झालेला नाही. तर नाशिक मंडळातील अहमदनगर जिल्ह्यात दोन आणि नाशिक शहरात दोन मृत्यू वगळता इतर जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. विदर्भातील एकाही जिल्ह्यात काल कोरोनामुळं कुणालाही जीव गमावावा लागलेला नाही. राज्यात काल 1825 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यात काल एकूण 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक 4 मृत्यू हे सातारा जिल्ह्यात झाले असल्याची नोंद आहे.


या जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकही मृत्यू नाही


ठाणे (Thane)
ठाणे मनपा (TMC)
कल्याण डोंबवली मनपा (KDMC)
उल्हासनगर मनपा (Ulhasnagar)
भिवंडी निजामपूर मनपा (Bhiwandi)
मीरा भाईंदर मनपा (Mira Bhaindar)
पालघर (Palghar)
रायगड (Raigad)
पनवेल मनपा (Panvel)
नाशिक (Nashik)
मालेगाव मनपा (Malegaon)
अहमदनगर मनपा (ahemdnagar)
धुळे (Dhule)
धुळे मनपा (Dhule Municipal corporation)
जळगाव (Jalgaon)
जळगाव मनपा (Jalgaon Municipal corporation) 
नंदूरबार (Nandurbar)
पुणे मनपा (PMC)
पिंपरी चिंचवड मनपा (PCMC)
सोलापूर (Solapur)
सोलापूर मनपा (Solapur Municipal Corporation)
कोल्हापूर (Kolhapur)
कोल्हापूर मनपा (Kolhapur Municipal corporation)
सांगली मिरज कुपवाड मनपा (sangli miraj kupwad corporation)
सिंधुदुर्ग (sindhurga)
औरंगाबाद (Aurangabad)
औरंगाबाद मनपा (Aurangabad Municipal corporation)
जालना (Jalna)
हिंगोली (Hingoli)
परभणी (parbhani)
परभणी मनपा (Parbhani Municipal corporation)
लातूर (Latur) 
लातूर मनपा (Latur Municipal corporation)
नांदेड (Nanded) 
नांदेड मनपा (Nanded Municipal corporation)
अकोला (Akola)
अकोला मनपा  (Akola Municipal corporation)
अमरावती (Amravati)
अमरावती मनपा  (Amravati Municipal corporation)
यवतमाळ (Yavatmal)
बुलढाणा (Buldhana)
वाशिम (Washim)
नागपूर (Nagpur)
नागपूर मनपा (Nagpur Municipal corporation)
वर्धा (Wardha)
भंडारा (Bhandara)
गोंदिया (Gondia)
चंद्रपूर (Chandrapur)
चंद्रपूर मनपा (Chandrapur Municipal corporation)
गडचिरोली (Gadchiroli)


कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल 1825 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 2 हजार 879 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 27  हजार 426  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.43 टक्के आहे. राज्यात काल 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.