Mumbai Corona Update : मुंबईतील (Mumbai) आज 80 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या किंचीत कमी झाली असून काल 100 नवे रुग्ण आढळले होते. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 80 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 118 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.
नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 650 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 100 रुग्णांपैकी 11 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 35 हजार 821 बेड्सपैकी केवळ 669 बेड वापरात आहेत. कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याने मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा दरही वाढत आहे. आज हा दर 5441 वर पोहोचला आहे. सील केलेल्या इमारतींची संख्या देखील शून्य आहे.सध्या मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही.
मुंबईत लोकल प्रवासासाठी संपूर्ण लसीकरण अनिवार्य
मुंबईत लोकलसह सार्वजनिक वाहतुकीच्या वापरासाठी लसीचे दोन्ही डोस घेणं नागरिकांना बंधनकारक ठेवण्यात आलं आहे. याची नोंद घेत 1 मार्च रोजी तयार केलेली कोरोना निर्बंधांबाबतची नवी नियमावली जाहीर करण्यास राज्य सरकारला हायकोर्टानं परवानगी दिली आहे. लोकल प्रवासासाठीच्या लससक्ती विरोधातील याचिका हायकोर्टानं बुधवारी निकाली काढली. मात्र नव्या नियमावलीला पुन्हा कोर्टात आव्हान देण्यास याचिकाकर्त्यांना मुभा देण्यात आली आहे.
मुंबईची अनलॉकच्या दिशेने वाटचाल
मागील काही आठवडे कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये रुग्णसंख्या बऱ्यापैकी नियंत्रणांत आल्याने आता केंद्र सरकारने नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने इतर व्यवहारही सुरळीत व्हावे यासाठी या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. राज्यातल्या 14 जिल्ह्यात 4 मार्चपासून नाट्यगृहे, सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळेही 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार आहे. या 14 जिल्ह्यांत मुंबईचाही समावेश असून इतर जिल्ह्यात 50 टक्के क्षमतेची अट कायम होणार आहे.
हे ही वाचा :
- Mumbai Local Train : मुंबईत लोकल प्रवासासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस अनिवार्य
- Maharashtra Unlock Guidelines : राज्यातील 14 जिल्हे अनलॉक, सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स 100 टक्के क्षमतेनं सुरु
- Covid Vaccination : भारतात Covishieldसह अनेक लसी सध्या वापरात, तर 'या' पाच लसींची भारताला प्रतिक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha