Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 479 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 329 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,05,646 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 660 झाली आहे. सध्या मुंबईत 3,127 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 479 रुग्णांमध्ये 449 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 1857 दिवसांवर गेला आहे.






सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत


राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 3127 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 2672 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 1120 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 195, रायगड 234, रत्नागिरी 89, सिंधुदुर्ग 59, सातारा 83, सांगली 188, कोल्हापूर 126, सोलापूर 140, नाशिक 460, अहमदनगर 313, जळगाव 35, धुळे 57, औरंगाबाद 181, जालना 40, बीड 39, लातूर 169, परभणी 28, हिंगोली 30, नांदेड 85, उस्मानाबाद 194, अमरावती 93, अकोला 38, वाशिम 102, बुलढाणा 45, यवतमाळ 73, नागपूर 1054, वर्धा 85, भंडारा 275, गोंदिया 158, गडचिरोली 83 आणि चंद्रपूरमध्ये 164 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 11889 सक्रिय रुग्ण आहेत.


राज्यात 1782 कोरोना रुग्णांची नोंद


राज्यात आज 1782 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1854 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे  मुंबई जिल्ह्यातील आहे. 


संबंधित बातम्या


Maharashtra Corona Update : राज्यात आज 1,782 नव्या रुग्णांचे निदान, सात कोरोनाबाधितांचा मृत्यू


Health Tips : कोरोनाचे बळी ठरलेल्या काही लोकांमध्ये स्मरणशक्तीशी संबंधित जाणवतायत 'या' समस्या