मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 420 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 355 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,31,749 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4161 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1373 दिवसांवर गेला आहे. सील केलेल्या इमारतींची संख्या देखील वाढली आहे. मुंबईतील सध्या 41 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही.
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1485 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 536 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 43 हजार 342 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.53 टक्के आहे. राज्यात आज 38 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 3984 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (14), नंदूरबार (0), धुळे (5), जालना (19), लातूर(54), परभणी (27), हिंगोली (20), नांदेड (20), अकोला (21), अमरावती (17), वाशिम (04), बुलढाणा (05), नागपूर (78), यवतमाळ (06), नागपूर (81), वर्धा (5), भंडारा (3), गोंदिया (3), चंद्रपूर (12) गडचिरोली (4 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. राज्यात सध्या 19 हजार 480 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,72, 600 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 933 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 22, 02, 811 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.