मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 301 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 463 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,32,889 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3966 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1555 दिवसांवर गेला आहे. सील केलेल्या इमारतींची संख्या देखील वाढली आहे. मुंबईतील सध्या 35 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही.
राज्यात आज 1130 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1130 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 148 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 49 हजार 186 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.57 टक्के आहे. राज्यात आज 26 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
Pune Corona Update : पुणे शहरात गेल्या 24 तासात शून्य मृत्यू तर 59 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
देशात गेल्या 24 तासांत 14 हजार कोरोनाबाधितांची नोंद
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप सुरुच आहे. देशात दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा घटला असला तरी, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या मात्र अधिक आहे. गेल्या 24 तासांत 14 हजार 313 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 549 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशात एकूण 4 लाख 57 हजार 740 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 13 हजार 543 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.