Mumbai Corona Update :  मुंबईत आज कोरोनाचे 172 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 94 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज मुंबईत एकाही कोरोना रूग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. दरम्यान, आज आढळलेल्या 172 रूग्णांपैकी 97 टक्के रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली नाहीत. 


गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांमध्ये घट होत असतानाच एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशभरात कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यातही कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच राज्यातील सर्वाधिक रूग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईतही दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. काल मुंबईत 117 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. ही संख्या आज 172 वर पोहोचली आहे. आज आढळलेल्या 172 रूग्णांपैकी पाच रूग्ण उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाले आहेत. मुंबईत सध्या 784 सक्रीय रूग्ण आहेत. तर आतापर्यंत  मुंबईत 19,563 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 


देशातील कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असताना राज्यातील रुग्णसंख्या मात्र, नियंत्रणात आली असल्याचं चित्र असून आज राज्यात एकूण 253 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 136 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.11 टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात आज एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला आहे. 


राज्यात सध्या 1277 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 784 तर पुण्यामध्ये 262 इतके सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत 77,29,931 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.


देशातील कोरोना रुग्णांमधील वाढ कायम 
देशातील कोरोना रुग्णांमधील वाढ कायम आहे. देशात आज एका दिवसात 3500 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.  देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 303 वर पोहोचली आहे. काल दिवसभरात देशात 3545 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 27 जणांचा मृत्यू झाला. 


महत्वाच्या बातम्या