मुंबई: देशातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढत असताना राज्यातील रुग्णसंख्या मात्र नियंत्रणात आली असल्याचं चित्र असून आज राज्यात एकूण 253 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये 136 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.11 टक्क्यांवर पोहोचलं आहे. 


एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
राज्यात आज केवळ एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला आहे. 


राज्यात सध्या 1277 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 784 तर पुण्यामध्ये 262 इतके सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत 77,29,931 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 


देशातील स्थिती
देशातील कोरोना रुग्णांमधील वाढ कायम आहे. आज एका दिवसात 3500 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 3805 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 303 वर पोहोचली आहे. काल दिवसभरात देशात 3545 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 27 जणांचा मृत्यू झाला. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.


देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 303 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 303 इतकी झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 3168 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 54 हजार 416 जण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 22 कोरोनोरुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनामुळे 5 लाख 24 हजार 24 रुग्णांनी प्राण गमावला आहे. देशातील कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 4 लाख 87 हजार 544 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. 


महत्त्वाच्या बातम्या :