Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी मुंबईत 151 नव्या रुग्णांची भर पडली आहे. रविवारी पाच रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रविवारी 122 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 122 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 885 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,401,163 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 5855 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.011% टक्के इतका आहे.
सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 885 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 310 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 160 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 25, रायगड 40, पालघर 40, नाशिक 15, नागपूरमध्ये 12 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 1518 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात आज 255 कोरोना रुग्णांची नोंद
आज महाराष्ट्रात 255 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर 175 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 77,31,467 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 98.10 टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात एका करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के एवढा असून राज्यात सध्या 1518 सक्रिय रूग्ण आहेत. यातील सर्वात जास्त सक्रीय रूग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईत सध्या 885 सक्रीय रूग्ण आहेत. देशातील कोरोना रूग्णांमध्ये किंचिंत घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 487 नवे कोरोनाबाधित आढळले असून 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर शनिवारी दिवसभरात 2 हजार 878 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
संबंधित बातम्या