Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी मुंबईत 150 नव्या रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी सहा रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सोमवारी 74 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 74 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 1370 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,42,122 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 3954 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.017% टक्के इतका आहे.
सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 1370 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 284 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 193 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 15, रायगड 32, पालघर 20 आणि नाशिकमध्ये 10 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 1978 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात आज 208 रुग्णांची नोंद
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. आज राज्यामध्ये 208 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 133 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,33,176 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे. गेल्या 24 तासात देशात 2 हजार 222 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात कोरोनामुळे 46 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
संबंधित बातम्या