मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. आज राज्यामध्ये 208 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 133 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत
आज एकही मृत्यू नाही
राज्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,33,176 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे.
राज्यात 1978 सक्रिय रुग्णांची नोंद
राज्यात आज एकूण 1978 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 1370 रुग्ण हे मुंबईमध्ये आढळतात. तर त्या खालोखाल पुण्यामध्ये, 284 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
देशात 2 हजार 222 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
गेल्या 24 तासात देशात 2 हजार 222 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात कोरोनामुळे 46 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या पेक्षा आज कोरोना रुग्णांच्या संख्येत थोडीशी घट झाली आहे. काल देशात 2 हजार 226 नवे कोरोना रुग्ण आढळले होते तर, 65 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आज (22 मे) जाहीर झालेल्या आकडेवारीत मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यापूर्वी 22 मे रोजी कोरोनाचे एकूण 2 हजार 326 नवीन रुग्ण आढळून आले होते आणि 65 जणांचा मृत्यू झाला होता. आज 2 हजार 222 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 46 जणांचा मृ्त्यू झाला आहे. दरम्यान, सक्रिय प्रकरणांमध्ये आता थोडीशी घट झाली आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजारांवरुन आता 14 हजार 832 वर आली आहे. जी सर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून जवळपास 2 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे.