Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी मुंबईत 234 नव्या रुग्णांची भर पडली आहे. रविवारी आठ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. रविवारी 151 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 


बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 151 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 1294 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,42,048 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 4208 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.016% टक्के इतका आहे.






सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत


राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 1903 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 287 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 180 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 19, रायगड 35, पालघर 20, नाशिक 12, नागपूरमध्ये 10 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 1903 सक्रिय रुग्ण आहेत.


राज्यात आज 326 रुग्णांची नोंद


शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत आज राज्यातील कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात आज 326 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे  राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के एवढा आहे. 


राज्यात काल 307 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर शुक्रवारी राज्यात 311 रूग्णांची नोंद झाली होती. आज राज्यात 251 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  त्यामुळे राज्यात आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 77,33,043 वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के एवढे झाले आहे. राज्यात सध्या 1903 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 


संबंधित बातम्या


Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 326 कोरोना रुग्णांची नोंद,  तर 251 जणांची कोरोनावर मात 


India COVID 19 Cases : गेल्या 24 तासात देशात 2 हजार 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 65 जणांचा मृत्यू