Mumbai Corona Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या मुंबईसह महाराष्ट्रात वाढत आहे. आज मुंबईत 1011 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शुक्रवारी 869 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,11,167 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.8 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,672 झाली आहे. सध्या मुंबईत 5,852 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 1011 रुग्णांमध्ये 941 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 863 दिवसांवर गेला आहे.
सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 5852 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 1557 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 1696 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 288, रायगड 235, रत्नागिरी 27, सिंधुदुर्ग 54, सातारा 72, सांगली 107, कोल्हापूर 101, सोलापूर 68, नाशिक 365, अहमदनगर 162, धुळे 13, औरंगाबाद 68, जालना 22, बीड 24, लातूर 91, परभणी 16, नांदेड 38, उस्मानाबाद 34, अमरावती 40, अकोला 26, वाशिम 19, बुलढाणा 15, यवतमाळ 22, नागपूर 378, वर्धा 44, भंडारा 90, गोंदिया 40, गडचिरोली 81 आणि चंद्रपूरमध्ये 47 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 11,733 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात 2,285 कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात आज 2,285 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2237 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई जिल्ह्यातील आहे.
संबंधित बातम्या