मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होऊ लागलीय. याचपार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोरोना वॉरिअर्सला देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली . पोलिस, डॉक्टरांनंतर आता  तीनशेहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सोबत वाहतूक पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली आहे यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, लोअर परळमधील वेस्टर्न रेल्वेच्या 500 हून अधिक कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली. यामध्ये 62 कर्मचारी पॉझिटिव्ह आले. तर महालक्ष्मी वर्कशॉपमध्ये केलेल्या चाचणीत 800  हून अधिक कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली. ज्यामध्ये 190  रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रेल्वेमध्ये सतत सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. तर सेंट्रल रेल्वेच्या 90 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 15 अधिकाऱ्यांसह 75 अन्य कर्मचारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत रेल्वेच्या 342 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 


मुंबई पोलिस दलामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव


मुंबईकरांसाठी ऑन ड्यूटी 24 तास असलेल्या पोलिसांनाही आता मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे.  मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलीस दलातील एकूण 18 बड्या अधिकाऱ्यांना  कोरोनाची लागण झाली आहे.  मुंबई पोलीस दलातील सह पोलीस आयुक्तांसोबत चार अप्पर पोलीस आयुक्त आणि तेरा पोलीस उपायुक्तांना कोरोनाची लागण झाली आहे. सोबतच मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. 


गेल्या 48 तासात 114 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना 


गेल्या 48 तासात मुंबई पोलीस दलातील 114 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तर तर 2 पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  आतापर्यंत एकूण 125 पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



इतर महत्त्वाच्या बातम्या :