मुंबई: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून काँग्रेसचे माजी विरोधीपक्ष नेते देवेंद्र आंबेरकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.


आंबेरकर हे गुरुदास कामत गटाचे असून, संजय निरुपम यांच्या एकाधिकारशाहीमुळे कामत गटातील नगरसेवकांना उमेदवारीत प्राधान्य मिळत नसल्याची चर्चा सध्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे.

यापूर्वीही माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. आता कामत गटाचे आंबेरकर यांनीही पक्षाला रामराम करुन शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेणार आहेत.

उद्या सकाळी 11.30 वाजता देवेंद्र आंबेरकर मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

संबंधित बातम्या

युतीच्या काडीमोडनंतर उमेदवारीसाठी सर्वपक्षीय मातोश्रीवर

..म्हणून मी मुंबईत प्रचाराला नाही : नारायण राणे

निवडणूक प्रक्रियेत सहभाग नको, गुरुदास कामत यांचा एसएमएस

काँग्रेसमध्ये गुन्हेगारांना तिकीट, कृष्णा हेगडे भाजपात