मुंबई : मुंबई काँग्रेसतर्फे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदत म्हणून जीवनावश्यक वस्तू, धान्य, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि औषधे पाठवण्यात आली. मदतीचे चार ट्रक आज मुंबई काँग्रेस कार्यलयातून रवाना करण्यात आले.
पूरग्रस्तांना मदत करताना याआधी भाजपचं भान सुटलं आणि मदतीच्या पाकिटांवर मुख्यमंत्री आणि भाजपचं पक्षचिन्ह असलेले फोटो छापले गेले. आता काँग्रेसनेही पूरग्रस्तांना मदत पाठवली आहे. परंतु, पूरग्रस्तांची मदत ही निवडणुकीचं कॅम्पेन ठरु नये, अशी आशा काँग्रेसच्या मिलिंद देवरा आणि भाई जगताप यांनी व्यक्त केली आहे.
कोल्हापूर, सांगली आणि कोकणात अतिवृष्टीमुळे भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आहे, अशा समस्यांचे राजकारण न करता जर सर्वांनी एकत्र येऊन काम केले, तर केलेल्या कामाला नक्कीच यश मिळते, असे मत मुंबई देवरा यांनी व्यक्त केले.
देवरा म्हणाले की, "मुंबई नेहमीच महाराष्ट्राच्या मदतीसाठी धावून आलेली आहे. राज्यामध्ये किंवा देशामध्ये जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली, त्या त्या वेळेस मुंबईकर नागरिक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. कोल्हापूर, सांगली आणि कोकणात अतिवृष्टीमुळे आज भयंकर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या महापुरामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तिथल्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आज मुंबई काँग्रेसतर्फे आम्ही या पूरग्रस्त नागरिकांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तू, धान्य, पाणी, औषधे तसेच या भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वस्तू पाठवत आहोत''
यावेळी देवरा यांच्यासोबत मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड, आमदार भाई जगताप, अमीन पटेल, नसीम खान, माजी आमदार मधू चव्हाण, बाबा सिद्दीकी, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अजंता यादव, मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील नरसाळे, क्लाइव्ह डायस, मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष कचरू यादव, मुंबई काँग्रेसचे महासचिव संदेश कोंडविलकर, तसेच मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूरग्रस्तांच्या मदतीमागे राजकीय प्रचाराचा हेतू? भाजप, मनसेपाठोपाठ काँग्रेसचीही मदत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Aug 2019 07:31 PM (IST)
पूरग्रस्तांना मदत करताना याआधी भाजपचं भान सुटलं आणि मदतीच्या पाकिटांवर मुख्यमंत्री आणि भाजपचं पक्षचिन्ह असलेले फोटो छापले गेले. आता काँग्रेसनेही पूरग्रस्तांना मदत पाठवली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -