Budget 2022 Central Railway Projects : नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात रेल्वेचाही अर्थसंकल्प सादर करण्यात आला. वर्ष 2017 पासून केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेच्या अर्थसंकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या मार्गांसाठी चांगली तरतूद करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या निधीतून नवीन रेल्वे मार्ग, पादचारी पूल, सिग्नल यंत्रणा अद्यावत करणे, रेल्वे यार्डमध्ये बदल आदी कामांचा समावेश आहे. 

मध्य रेल्वेवरील प्रकल्पांसाठी वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षांसाठी 7251 कोटी मिळाले आहेत. मागील आर्थिक वर्ष 2021-22 च्या तुलनेत यंदाच्या वर्षी जवळपास 50 टक्के अधिक निधी मिळाला आहे. 

मध्य रेल्वेवरील कोणत्या प्रकल्पासाठी काय मिळाले?

>> नवीन मार्गिकांसाठी 1455 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन मार्ग आणि आर्थिक तरतूद

> अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ 250 किमी - रु. 567 कोटी

> वर्धा-नांदेड मार्गे यवतमाळ पुसद 270 किमी - रु. 820 कोटी

> सोलापूर-उस्मानाबाद मार्गे तुळजापूर 84 किमी - रु. 10 कोटी

> धुळे-नरडाणा 50 किमी - रु. 50 कोटी

> कल्याण-मुरबाड मार्गे उल्हासनगर 28 किमी  - रु. 5 कोटी

>> रेल्वे मार्ग दुहेरीकरण/ तिसरी मार्गिका/ चौथी मार्गिका - एकूण तरतूद 3628 कोटी रुपये

> कल्याण-कसारा तिसरी मार्गिका 68 किमी - रु. 160 कोटी

> वर्धा-नागपूर तिसरी मार्गिका  76 किमी - रु. 87 कोटी

> वर्धा-बल्हारशाह तिसरी मार्गिका 132 किमी - रु. 305 कोटी

> पुणे-मिरज-लोंडा दुहेरीकरण 467 किमी - रु. 1567 कोटी

> दौंड-मनमाड दुहेरीकरण 247 किमी - रु. 500 कोटी

> वर्धा-नागपूर चौथी मार्गिका ७९ किमी - रु.130 कोटी

> मनमाड-जळगाव तिसरी मार्गिका 160 किमी -  रु. 205 कोटी

> जळगाव-भुसावळ चौथी मार्गिका 24 किमी - रु. 55 कोटी >> वाहतूक सुविधा, यार्ड रिमॉडेलिंग आणि इतर कामे –  

> पनवेल-कळंबोली कोचिंग टर्मिनस फेज-I टप्पा-I - रु. 20 कोटी

> लोकमान्य टिळक टर्मिनस कोचिंग सुविधा वाढवणे - रु. 20 कोटी

> सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 10, 11, 12, 13 चा  24 डब्यांसाठी विस्तार करणे - रु. 20 कोटी

> हडपसरचा सॅटेलाइट टर्मिनल म्हणून विकास रु. 21 कोटी

> अजनीचा सॅटेलाइट टर्मिनल म्हणून विकास रु. 35 कोटी

> पुणे रेल्वे स्थानकात 24/26 डब्यांसाठी प्लॅटफॉर्म विस्तार - 31 कोटी रुपये

>> रस्ता सुरक्षा कामे- रेल्वे पादचारी पूल 

विक्रोळी - रु. 6 कोटी

पुलगाव -  रु. 5.5 कोटी

नगरगाव - रु. 4.33 कोटी

दिवा - रु. 4 कोटी

>> महानगर परिवहन प्रकल्पासाठी ( MUTP)करण्यात आलेली तरतूद

> बेलापूर-सीवूड-उरण मार्ग 150 कोटी रु

> MUTP टप्पा-II - रु. 185 कोटी

> एमयूटीपी टप्पा III - रु. 190 कोटी

> MUTP टप्पा III-A- रुपये 200 कोटी

त्याशिवाय,  रेल्वे रुळ नूतनीकरणासाठी 1048 कोटी,  पुलाचे आणि बोगद्याच्या कामासाठी ९० कोटी,  सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशनशी निगडीत कामांसाठी 216 कोटी रुपयांची तरदूत करण्यात आली आहे.