मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडच्या कामाला येत्या मे महिन्यापासून सुरुवात होणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्तांनी दिली. निविदा प्रक्रियेचं काम शेवटच्या टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात महापालिका आयुक्त अजॉय मेहता बोलत होते.


कोस्टल रोड दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा मरीन ड्राइव्ह ते वरळी बांद्रा सी लिंकपर्यंत असेल. याची जबाबदारी मुंबई महापालिकेची असणार आहे. तर बांद्रा सी लिंक ते वर्सोवापर्यंतच्या दुसऱ्या टप्प्याचं काम एमएसआरडीसी करणार आहे.

कोस्टल रोडचा पहिला टप्पा 9.8 किमी लांबीचा असेल, त्यात गिरगाव चौपाटी ते पेडर रोडपर्यंत समुद्रखालून असणार आहे.

मुंबई कोस्टल रोडच्या टेंडर बिडिंगसाठी शेवटची तारीख 22 फेब्रुवारी देण्यात आली आहे. कोस्टल रोडच्या कामासाठी L&T, रिलायंस, ह्युंदाई सारख्या बड्या कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. टेंडर सबमिशननंतर दोन महिन्यात छाननी होईल. मे महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. दोन टप्प्यात कोस्टल रोड बांधला जाईल.

नेमका कसा असेल मुंबईचा कोस्टल रोड?

- पहिला टप्पा - मरीन ड्राइव्ह ते वरळी

- दुसरा टप्पा - बांद्रा सी लिंक ते वर्सोवा

- 4 ठिकाणी एन्ट्री-एक्झिटसाछी इंटरचेंज असतील.

- गिरगाव चौपाटी ते पेडर रोडपर्यंत समुद्रखालून भुयारी मार्ग

- सिग्नल आणि टोल फ्री असणार मुंबईचा कोस्टल रोड