मुंबई: उपनगरातील चेंबूर परिसरात एका चाळीतील दुमजली घराला लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी पहाटे ही सिद्धार्थ नगर परिसरात दुर्घटना घडली. येथील चाळीत अनेक वन प्लस वन स्ट्रक्चरची घरे आहेत. यापैकी एका घराला अचानक आग लागली. या घरातील कुटुंबीयांना वेळीच आग लागल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे एकाच कुटुंबातील 7 जणांचा झोपेत असताना होरपळून मृत्यू झाला. यामध्ये 7 वर्षांच्या एका मुलीचाही समावेश आहे. या सगळ्यांना अग्निशमन दलाने घरातून बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर ही आग घरात पसरत गेली. गुप्ता कुटुंबीय झोपेत असल्याने त्यांना आग लागल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब आगीत होरपळून मृत्यूमुखी पडले. पारिस गुप्ता (वय 7), मंजू प्रेम गुप्ता (वय 30), अनिता प्रेम गुप्ता (वय 39), प्रेम गुप्ता (वय 30), नरेंद्र गुप्ता (वय 10) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. 


क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं


पहाटे पाचच्या सुमारास ही आग लागली.  आग  लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या, स्थानिक पोलीस  पोहचले. सध्या ही आग विझवण्यात आलेली आहे. आगीतील जखमींना तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र  त्यांना मृत घोषीत करण्यात आले.  आज रविवार असल्याने गुप्ता कुंटुंब हे रात्री जेवण करुन गाढ झोपले होते. पहाटे साखरझोपेत असताना अचानक घराला आग लागली. ही आग इतकी भयानक होती, की क्षणार्धात संपूर्ण घराला आगीचा विळखा पडला. त्यामुळे काही कळण्याच्या आतच गुप्ता कुटुंबाच क्षणार्धात होत्याच नव्हतं झाले.


परिसरात हळहळ 


आग  लागली  तो सिद्धार्थ कॉलनीचा परिसर हा गायकवड मार्गाजवळ आहे.  हा झोपडपट्टीचा परिसर आहे.  या परिसरात  अनेक  वन प्लस वन आहेत.  गुप्ता कुटुंबाची वन प्लस वन झोपडी होती. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  




हे ही वाचा :


बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर