मुंबई : विधानपरिषद पोटनिवडणुकीत उमेदवारच्या पाठिंब्यासाठी भाजपने थेट 'मातोश्री'ला साकडं घातलं आहे. यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 'मातोश्री'वर दाखल झाले आहेत.

चंद्रकांत पाटील यांच्यासोबत शिक्षणमंत्री विनोद तावडेही 'मातोश्री'वर पोहोचले आहेत.

पुढील महिन्यात 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे विधानपरिषद पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता धूसर झाली आहे. कारण याच जागेसाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा म्हणून भाजप-शिवसेनेत वाटाघाटीही सुरु झाल्या आहेत.

नारायण राणेंच्या उमेदवारीला त्यांचा विरोध आहे, हे उघड आहे. भाजपने उमेदवार दिला, तरी शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय उमेदवार जिंकून येणं कठीण आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात काल फोनवरुन चर्चाही झाली. मात्र शिवसेनेची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.

त्यानंतर आज मातोश्रीवरील भेटीत चंद्रकांत पाटील भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी उद्धव ठाकरेंकडे करणार आहेत.

https://twitter.com/ritvick_ab/status/933592631786926081

संबंधित बातम्या

विधानपरिषद पोटनिवडणुकीतून राणे आऊट?

राणेंबाबत संभ्रम कायम, भाजपकडून इतर उमेदवारांची चाचपणी