मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि निष्णात वकील कपिल सिब्बल मुंबईतील फेरीवाल्यांची सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी यासंदर्भात माहिती दिली.


फेरीवाल्यांसंदर्भातील 1 नोव्हेंबरला मुंबई हायकोर्टाने जो निर्णय दिला होता, त्या निर्णयाला संजय निरुपम आव्हान देणार आहेत आणि त्यासाठी कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात हा खटला लढवतील.

कपिल सिब्बल कोण आहेत?

कपिल सिब्बल यांच्या गाठीशी वकील म्हणून दांडगा अनुभव आहे. काँग्रेस पक्षातील राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ नेते असलेले कपिल सिब्बल हे यूपीएच्या काळात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री होते.

https://twitter.com/sanjaynirupam/status/933585722430300161

मुंबई हायकोर्टाने 1 नोव्हेंबरला काय निर्णय दिला होता?

फेरीवाल्यांवरील कारवाईविरोधात दाद मागणाऱ्या मुंबई  काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना हायकोर्टाने दणका दिला होता. मुंबईत कुठेही फेरीवाल्यांना धंदा करु देण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली होती. शिवाय, मुंबईत फेरीवाल्यांना निर्धारीत फेरीवाला क्षेत्रातच व्यवसाय करण्यास परवानगी हायकोर्टाने दिली.

हायकोर्टाने फेरीवाल्यांना कुठे मनाई केली आहे?

- शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, हॉस्पिटलच्या 100 मीटरच्या आवारात फेरीवाल्यांना मनाई
- रेल्वे स्टेशन, पालिका मंडईच्या 150 मीटर परिसरात फेरीवाल्यांना मनाई
- रेल्वे पादचारी पुल, स्कय वॉकवर फेरीवाल्यांना मनाई