निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
मुंबई सेंट्रल परिसरात स्लॅब कोसळून कामगाराचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 14 Aug 2016 03:30 AM (IST)

मुंबई : मुंबई सेंट्रल परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. शनिवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला. मराठा मंदिर सिनेमागृहाजवळ मेहेर व्हिला या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. इमारतीखाली उभ्या असलेल्या कमलुद्दीन अन्सारी या कामगारावर स्लॅब कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. एक कामगार या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी नायर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात पुण्यातील बालेवाडीत स्लॅब कोसळून 9 कामगारांचा मृत्यू झाला होता.