एचडीएफसी बँकेत असिस्टंट मॅनेजरपदावर कार्यरत असलेले विजय केंद्रे रात्री 7.45 च्या सुमारास कामावरुन घरी परतत होते. यावेळी भिवंडी बायपास कोन रोडला त्यांची बाईक खड्ड्यात आदळली. त्यामुळे त्यांचा तोल गेला. त्याचवेळी मागून येणारा गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक त्यांच्या डोक्यावरुन गेला.
केंद्रेंच्या हेल्मेटचा चक्काचूर होऊन त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. यात विजय यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असणारा मित्र बाजूला फेकला गेल्यामुळे किरकोळ जखमी होऊन बचावला.
विजय यांच्या पश्चात 13 वर्षांचा मुलगा आणि पत्नी असं कुटुंब आहे. ही दुर्दैवी घटना रस्त्यावरील खड्डयांमुळे घडली असल्याचं विजयच्या नातेवाईकांकडून बोललं जात आहे. या घटनेला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे, रस्त्यावरील खड्डे वेळेवर बुजवले असते तर आज विजयला आपला जीव गमवावा लागला नसता, आता तरी प्रशासनाने रस्त्यावर असणारे खड्डे बुजवावेत अशी मागणी स्थानिक करत आहेत.