मनोरा आमदार निवासात सतीश पाटलांच्या खोलीत छत कोसळलं
एबीपी माझा वेब टीम | 31 Jul 2017 08:07 AM (IST)
मुंबईतील मनोरा आमदार निवासात आमदार सतीश पाटील यांच्या रुममधील सीलिंग कोसळल्याची माहिती आहे.
मुंबई : मुंबईतील मनोरा आमदार निवासातील खोलीत छत कोसळल्याची घटना समोर आली आहे. आमदार सतीश पाटील यांच्या रुममधील सीलिंग कोसळल्याची माहिती आहे. आमदार सतीश पाटील हे मनोरा आमदार निवासातील रुम नंबर डी 125 मध्ये राहतात. अँटी चेंबरमधील पीओपीसहित छत कोसळलं. सतीश पाटील हे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-पारोळामधील राष्ट्रवादीचे आमदार आहेत.