याप्रकरणी गिरकर यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. यात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले आहेत.
सफाई कामगार भरतीमध्ये दहावी पास असलेल्या उमेदवारांना जे प्रश्न विचारलेत त्याची उत्तरं पदवीधर विद्यार्थ्यांनाही येतील की नाही ही शंका आहे. आता महापालिका ही परीक्षा रद्द करते का हे पाहणं महत्वाचं आहे.
दरम्यान, याप्रकरणी आमदार गिरकर यांनी मुख्यमंत्री आणि मुंबईच्या महापौरांना परीक्षा रद्द करुन पुन्हा घेण्याबाबत पत्र लिहिलं आहे.
सफाई कामगार भरतीसाठी विचारलेले भन्नाट प्रश्न
1. भारताचे 44 वे सरन्यायाधीश कोण?
2. 88 नक्षत्रांमधील सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते?
3. फुलांमध्ये अथवा वनस्पतीमध्ये दुसऱ्या फुलांमधील किंवा वनस्पतींमधील परागकणांच्या होणाऱ्या परागसिंचनास काय म्हणतात?
4. गायनेशियम म्हणजे काय?
5. लोणच्यामध्ये उपयोगात येणाऱ्या विनेगर मध्ये काय असते?
6. सिरिकल्चर कशाशी संबंधित आहे ?
7. निशा आणि मिशा यांनी अनुक्रमे 2000 आणि 2750 गुंतवणूक करुन एक व्यवसाय चालू केला. तथापि, मिशा हिला काही महिन्यानंतर आपला पैसा काढावा लागला. त्यांच्या परिणामी 12 महिन्यांच्या शेवटचा नफा निशा आणि मिशा यांमध्ये 12:11 या गुणोत्तरांने वाटला गेला. निशा हिने आपला पैसा गुंतवून ठेवलेल्या महिन्यांची संख्या किती.
8. 72 कि.मी. ताशी या गतीने प्रवास करणारी एक आगगाडी 6 सेकंदात 1 पोल ओलांडते. ही आगगाडी 480 मीटर फलाट पार करायला किती वेळ लावेल?
संबंधित बातमी
सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते? BMC सफाई कामगार भरतीत भन्नाट प्रश्न